Home > News Update > जगात 'गांधी' भारतात 'गोडसे': नेटक-यांचा मोदींवर हल्ला

जगात 'गांधी' भारतात 'गोडसे': नेटक-यांचा मोदींवर हल्ला

जगात गांधी भारतात गोडसे: नेटक-यांचा मोदींवर हल्ला
X

अमेरीका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोशल मिडीयावर ट्रोल होत असून काल अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीत गांधी जयंतीची चर्चा झाल्यानंतर मोदींच्या वक्तव्यावरुन सोशल मिडीयात मोदींवर जगात 'गांधी' भारतात' गोडसे असा हल्ला झाल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरीका दौऱ्याच्या प्रवासापासून नेटकऱ्यांचे लक्ष झाले आहेत. विमान प्रवासात फाईल्सचा अभ्यास करताना मोदींचा फोटो देखील ट्रोल झाला होता. त्यानंतर अमेरीकेच्या उपराष्ट्राध्यत्रक्ष कमला हॅरीस यांच्या भेटीनंतर मोदींनी फोटो शेअर केले. परंतू उशिरापर्यंत कमला हॅरीस यांनी कोणतेही ट्विट न केल्यामुळे नेटकऱ्यांना पुन्हा मोदींवर टीका केली होती. अखेर कमला हॅरीस यांच्या कार्यालयाने मोदींबाबत ट्विट केल्यानंतर चर्चा थांबली.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची व्हाईट हाऊसमधे भेट झाली या भेटी दरम्यान त्यांनी कोरोना, वातावरण बदल, व्यापार, तंत्रज्ञान या विष्यांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत आदरांजली वाहिली.

बायडेन यांनी गांधींजींचे विचार आणि मुल्यांबाबत बोलताना पुढच्या आठवड्यात येऊ घातलेल्या गांधी जयंतीचा उल्लेख केला. `` गांधीजींची विश्वस्तपणाची कल्पना जगासाठी महत्वाची आहे. गांधीजींच्या अहिंसेच्या संदेशाला आम्ही पुढील आठवड्यात गांधी जयंती साजरी करुन उजाळा देणार असल्याचे बायडेन म्हणाले.``

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'राष्ट्रपती जो बायडन यांनी गांधीजींच्या जयंतीचा उल्लेख केला. गांधीजी ट्रस्टीशिपबद्दल बोलले होते की, अवधारणा जी आपल्या येत्या काळात खूप महत्वाची आहे. हे विश्वस्त त्या ट्रस्टीशिपसाठी देखील खूप महत्वाचे आहे, महात्मा गांधींनी नेहमीच आम्ही या ग्रहाचे विश्वस्त आहोत असा सल्ला दिला. हा ट्रस्टीशीप स्पिरिट भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये महत्वाची भूमिका बजावेल.


या चर्चेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी याबाबत `जगात गांधी- भारतात गोडसे` असा ट्रेंड सुरु केला आहे. भाजपा आणि उजव्या विचाराच्या संघटनांकडून नेहमीच गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेचे उद्दातीकरण केले जाते. नथुराम गोडसे मंदीर आणि पुतळा उभारण्याचे प्रयत्नही भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर झाले आहेत. परंतू भाजप नेतृत्वाकडून कधीही यावर भाष्य केले जात नाही. आजही अनेक भाजप प्रणित संघटना गांधी हत्या योग्य असल्याचे समर्थन करत गोडसेचा उदोउदो करत आहेत. याचाच संदर्भ देत नेटकऱ्यांनी मोदीच्या तोंडातून गांधी स्तुती होत असली तर मनात गोडसे असल्याचे म्हटले आहे. या विषयावर दोन्ही बाजूंना वाद-प्रतिवाद होत आहे. मोदींचे खऱ्या अर्थाने मनपरीवर्तन झाले तर पुढील आठवड्यात होणाऱ्या गांधी जयंतीला अभिवादन ठरेल अशाही नेटकऱ्यांच्या भावना आहेत.

Updated : 25 Sep 2021 3:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top