Home > News Update > Local train fail kopar station: कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेन बंद पडल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प

Local train fail kopar station: कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेन बंद पडल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प

मुंबईची जीवन वहिनी असलेल्या लोकल मध्ये बिघाड झाल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.

Local train fail kopar station: कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेन बंद पडल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प
X

सेंट्रल मार्गावरील (Central railway) कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सला (Kalyan to CSMT local) जाणाऱ्या 7 वाजून 56 मिनिटाच्या एसी लोकल ट्रेनमध्ये झाला तांत्रिक बिघाड (Train fail) झाला. या बिघाडामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसला (CSMT) जाणाऱ्या काही लोकल केल्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.

यावेळी लोकल मध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याण (Kalyan station) आणि डोंबिवली (Dombivli station) दरम्यान धीम्या मार्गावरील (slow local) वाहतूक रोखण्यात आली असून ही ट्रेन लवकरच कारशेडमध्ये नेणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

या बिघाडामुळे कामा वरून घरी परतत असलेल्या चाकरमालांचे चांगलेच हाल होत आहे. डोंबिवली स्टेशन परिसरात एका मागे एक अशा ट्रेनच्या रांगा लागल्या आहेत तर कल्याण डोंबिवली सह अनेक स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

लोकल रद्द, प्रवासी संतप्त

मुंबईहून डोंबिवलीकडे जाणारी डोंबिवली लोकल अचानक ठाणे रेल्वे स्थानकावर रद्द (Thane station local cancel) करण्यात आली. यामुळे संतप्त प्रवाशांनी ठाणे रेल्वे स्थानकावर रेल रोको (Rail roko) करण्याचा इशारा दिला. तब्बल एक तासांच्या दिरंगाईनंतर प्रवाशांचा आक्रमक पावित्रा पाहून रेल्वे प्रशासनाने बदलापूर विशेष लोकल (Badlapur special local train) ठाणे रेल्वे स्थानकावर पाठवली. ऐन वेळी लोकल रद्द केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यावेळी प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Updated : 29 April 2023 6:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top