देशात कोरोनाच्या संख्येत वाढ

Courtesy : Social Media

जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आसताना ,चीन मधील वुहान शहरातून कोरोनाची सुरुवात झाली. आता कोरोना विषाणू जगातील 21 देशात पोहचला आहे. कोरोनाची झळ भारतालाही बसत आहे, केरळ राज्यात पहिल्यांदा विषाणूग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतर भारतात ही मोठ्याप्रमाणात या संबंधीची जनजागृती मोहीम केंद्रसरकारने हाती घेतली आहे.

भारतात आत्तपर्यंत हा विषाणू केरळ, राजस्थान ,आणि आता महाराष्ट्रात पसरला आहे. महाराष्ट्र राज्यात आघाडी सरकारने मुंबई,पुणे ,नाशिक, यासारख्या मोठ्या शहरात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्ययत्रंणांना सज्ज राहण्यासाठी आरोग्यमंत्र्यानी सांगितले आहे .मुंबईत दोन कोरोनाग्रस्त संशयीत आढळून आल्यानंतर परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची आरोग्यतपासणी करण्याचे सक्त आदेश आरोग्यखात्याने दिले आहेत.