Home > News Update > राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांनी ट्विट करून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली 'ही' मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांनी ट्विट करून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली 'ही' मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांनी ट्विट करून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ही मागणी
X

पिंपरी चिंचवड//अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून या घटनेत 11 रुग्णांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी ट्विट करून नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह जिल्ह्यातही होण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. कारण तेथील अनेक रुग्णालयांचे फायर ऑडीटच झाले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड येथे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील 110 रुग्णालयांचे फायर ऑडीटच झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. कोविड रुग्णालयात देशात आग लागून अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयांचे फायर ऑडीटच , तसेच स्ट्रक्चरल ऑडीटही झाले असल्याची खात्री सबंधितांना करावी, असे सूचक ट्विट त्यांनी 3 तारखेला केले. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ट्विट पार्थ पवार यांनी केले.

शहरात अपूर्ण राहिलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाने नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. सत्ताधाऱ्यांनी सुनियोजित शहराचा कारभार बिघडवून सुरु केलेली कामे अपूर्ण ठेवली आहेत,असा हल्लाबोल त्यांनी केला.

सोबतच हीच का स्मार्टसिटी? , अशी खोचक टोला त्यांनी लगावला.

Updated : 9 Nov 2021 1:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top