Home > News Update > प्रविण दरेकर यांच्या पोस्टरला शेण लावत धुळ्यात निषेध

प्रविण दरेकर यांच्या पोस्टरला शेण लावत धुळ्यात निषेध

प्रविण दरेकर यांच्या पोस्टरला शेण लावत धुळ्यात निषेध
X

राष्ट्रवादी पक्षावर केलेल्या टीकेमुळे आता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्ता चांगल्याच आक्रमक झाली आहे. धुळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने प्रविण दरेकर यांच्या पोस्टरला चपला मारून तसेच शेण लावून प्रवीण दरेकर यांचा जोरदार निषेध करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे असं म्हणत भाजपाचे नेते प्रविण दरेकरांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर नाव न घेता टीका केली होती. प्रविण दरेकर यांच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या भाजपा पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे.

प्रविण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, तसेच महाराष्ट्रात दरेकर यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस फिरू देणार नाही असा इशारा धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी दिला.

Updated : 14 Sep 2021 12:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top