“शरद पवार सच्चा हैं, फडणवीस बच्चा हैं” राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा
Max Maharashtra | 27 Sept 2019 1:04 PM IST
X
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी स्वतःहून हजर होणार आहेत. आपल्या नेत्याला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुबईमध्ये ईडी कार्यालय परिसरात दाखल झाले आहेत. “शरद पवार सच्चा हैं, फडणवीस बच्चा है”, “कोण आला रे कोण आला, मोदी-शाहचा बाप आला” अशा घोषणांनी हा परिसर दणाणून निघाला आहे.
- ऑपरेशन ‘ईडी’ संपवून शरद पवार पुरग्रस्तांच्या भेटीला
- ‘ईडी’ची माघार; चौकशीची गरज नसल्याचं ‘ईडी’चं पवारांना पत्र
कायदा सुव्यवस्थेचा विचार करता दक्षिण मुंबईच्या अनेक भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलंय. यासोबतच मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप आलंय. असं असलं तरी वेगवेगळ्या मार्गांनी कार्यकर्ते या परिसरात जमत आहेत.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांचा काहीही संबंध नसताना, फक्त निवडणुका ध्यानात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद मिळतोय पाहून पवार साहेबांवर ईडीची कारवाई करण्याचा प्रकार भयंकर आहे. या देशात लाकशाही राहिली आहे की नाही? @NCPspeaks#IAmWithPawarSaheb pic.twitter.com/9b5Hybv5n7
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 27, 2019
राष्ट्रवादी महिला आघाडी सरकारविरोधात आक्रमक....
प्रदेश कार्यालयाबाहेर सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी...
आम्ही साहेबांसोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार..@MPVandanaChavan #iamwithsharadpawarsaheb#saheb #मीसाहेबांसोबत pic.twitter.com/uIdk11DRAM
— NCP (@NCPspeaks) September 27, 2019
Updated : 27 Sept 2019 1:04 PM IST
Tags: ed ncp sharad pawar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire