Home > News Update > सुप्रिया सुळेंना विनंती करुनही अद्यापर्यंत बेड मिळाले नाही: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची व्यथा

सुप्रिया सुळेंना विनंती करुनही अद्यापर्यंत बेड मिळाले नाही: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची व्यथा

सुप्रिया सुळेंना विनंती करुनही अद्यापर्यंत बेड मिळाले नाही: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची व्यथा
X

भिवंडीतील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचा माजी अध्यक्ष रुपेश जाधव यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या ते भिवंडीतील अमृत रुग्णालयात दाखल आहेत. परंतु त्यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन बेडची नितांत गरज आहे.

या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दोन दिवसांपासून कॉल करत आहोत. परंतु ते फोन घेत नाही. त्यांचे पीए देखील फोन घेत नाही. त्यांच्या पक्षासाठी आम्ही कायम कार्यरत राहिलो. आज त्यांच्या मदतीची गरज असूनही आम्हाला मदत मिळत नाही. माझ्या भावाचा जीव वाचविण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. आम्हा कार्यकर्त्यांनाच मदत मिळत नाही तर लोकांच्या जीवाचं काय? असं रुग्णाचे भाऊ आणि जितेंद्र आव्हाड यांच्या सोशल मीडियाचे माजी अध्यक्ष प्रणित जाधव यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना म्हटलं आहे.

राजकीय मंडळी कामापूर्ती जनतेचा वापर करतात आम्ही दोन दिवसांपासून आमच्या भावाच्या जीवासाठी अनेक रुग्णालय फिरलो परंतु मदत अद्याप मिळाली नाही. दरम्यान, माझी बहिण योगिता जाधव हिने माझ्या भावासाठी तात्काळ ऑक्सिजन बेडची सुविधा करुन देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

काय म्हटलं आहे ट्विट मध्ये



साहेब माझ्या भावाला सकाळ पासून बेडची आणि ऑक्सिजन ची गरज आहे. सकाळ पासून आम्ही खूप हॉस्पिटल मध्ये गेलो पण आम्हाला पूर्ण सुविधा भेटत नाही. त्याला येत्या दोन तासात अजून फास्ट ऑक्सिजन ची गरज आहे. आव्हाड साहेब हात जोडून विनंती आहे की आमची मदत करा... असं ट्विट करत योगिता जाधव हिने खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांना टॅग केलं आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना तात्काळ पत्ता मागितला.



जाधव कुटुंबाकडून पत्ताही देण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत या रुग्णाला मदत मिळालेली नाही. त्यांच्या घरातील प्रितम जाधव यांच्याशी आम्ही फोनवरुन संपर्क साधला तेव्हा त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने फोन उचलला. तेव्हा त्यांनी अद्यापपर्यंत बेड मिळाला नसल्याचं मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं. त्यांना एक कॉल आला होता. हा कॉल जितेंद्र आव्हाड यांच्या माणसाचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कुटुंबियांना कॉल केल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देखील आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फोन घेतला नाही.

दरम्यान सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड सांगुनही राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना मदत मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केलं जात आहे.

Updated : 18 April 2021 11:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top