Home > News Update > राजीनामा देण्यासाठी भास्कर जाधव औरंगाबादकडे रवाना, आज शिवसेना प्रवेश

राजीनामा देण्यासाठी भास्कर जाधव औरंगाबादकडे रवाना, आज शिवसेना प्रवेश

राजीनामा देण्यासाठी भास्कर जाधव औरंगाबादकडे रवाना, आज शिवसेना प्रवेश
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा शिवसेना पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. आज ते राष्ट्रवादीचं घड्याळ काढून हाती शिवबंधन बांधणार असल्याचं कळतंय.

त्याआधी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी औरंगाबादला रवाना झाले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ते आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करतील. जाधव यांच्यासोबत शिवसेना नेते रामदास कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत आहेत.

जाधव यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा आणखी एक महत्वाचा नेता शिवसेनेचा गळाला लागणार आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचं बोललं जातंय.

Updated : 13 Sep 2019 3:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top