News Update
Home > Election 2020 > ‘चंपा’ला पवार कुटूंबाशिवाय काही दिसत नाही- अजित पवार

‘चंपा’ला पवार कुटूंबाशिवाय काही दिसत नाही- अजित पवार

‘चंपा’ला पवार कुटूंबाशिवाय काही दिसत नाही- अजित पवार
X

‘चंपा’ला पवार कुटूंबाशिवाय काही दिसत नाही का? चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील शॉर्टकट.. असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आगामी निवडणुकांमध्ये पवार कुटूंबातील तरुण व्यक्तीमत्व राजकारणात आलं असत तर, स्वागत आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना अजित पवारांनी त्यांना चंपा म्हणत टीका केली आहे.

विधानसभा निवडणुक प्रचारात पार्थ पवार सक्रिय नाहीत याविषयी विचारले असता “मी पार्थचा बाप आहे. त्याने विधानसभेला येऊ नये असं मला वाटतं. आम्ही आमच्या घरात काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही पक्षासंबंधी चर्चा करा,”अशा शब्दात उत्तर दिलं.

Updated : 10 Oct 2019 12:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top