Home > News Update > आपल्यावरील हल्ल्यामागे राष्ट्रवादीच – गोपीचंद पडळकर

आपल्यावरील हल्ल्यामागे राष्ट्रवादीच – गोपीचंद पडळकर

आपल्यावरील हल्ल्यामागे राष्ट्रवादीच – गोपीचंद पडळकर
X

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी एका तरुणाने दगडफेक केली होती, यामागे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. तसेच दगडफेक करणारा तरुण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

माझ्यावर हल्ला करणारा हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून त्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो आहेत, त्यामुळे माझ्यावर हल्ला कुणी केला हे आता महाराष्ट्राला कळून चुकलं असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय, ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. आपण जे मुद्दे मांडतो त्यावर बोला असं जाहीर आव्हान देखील पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलंय. शरद पवार हे राष्ट्रवादीसाठी मोठे असतील मी त्यांना मोठं मानत नाही, या शब्दात त्यांनी टीकाही केली आहे.

Updated : 1 July 2021 10:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top