Home > News Update > #NCBआर्यन खान प्रकरणात तोंडघशी :SIT चौकशीत वानखडेंच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

#NCBआर्यन खान प्रकरणात तोंडघशी :SIT चौकशीत वानखडेंच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

#NCBआर्यन खान प्रकरणात तोंडघशी :SIT चौकशीत वानखडेंच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
X

शाहरुख खान पुत्र आर्यन खान ड्रग प्रकरणात अडकल्यानंत मोठं राजकीय वादळ उठलं होतं. वादग्रस्त एनसीबी अधिकारी समीर वानखडेंच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर NCB ने नेमलेल्या SIT चौकशीत कोणतेही अंमली पदार्थ आर्यनकडे सापडले नसल्याचे उघड झाले आहे.

कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असं एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंती उघड झालं आहे. आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही असं या समितीनं म्हटलं आहे.

या चौकशीत आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते त्यामुळे त्याचा फोन घेऊन चॅट तपासण्याची गरज नव्हती. चॅटमधूनही तो आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिडिंकेटचा भाग असल्याचं सिद्ध होत नाही. त्याचसोबत NCB च्या नियमानुसार छापा टाकताना व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला नव्हता. गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्स सिंगल रिकव्हरी म्हणून नोंदवले होते असं SIT चौकशीतून समोर आलं आहे.

SIT तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. या चौकशीचा अतिम अहवाल येण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात असं NCB चे महासंचालक एस. एन प्रधान यांनी सांगितले आहे. कुठल्याही निर्णयापूर्वी कायदेशीर बाबी तपासून घेतल्या जातील. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या चौकशीतून समीर वानखेडे यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. समीर वानखेडे यांनी मागील वर्षी २ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यातून क्रूझवरुन १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम गांजा तसेच दीड लाखांपर्यंत रोकड जप्त केली होती.

या प्रकरणात एनसीबीने असं म्हटलं होतं की अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. हे ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर एनसीबीचा दावा असा होता की आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आता एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर हे उघड झालं आहे की आर्यन खानकडे कोणतंही ड्रग नव्हतं आणि त्याचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नव्हता. तसंच अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज हे व्यावसायिक वापराच्या प्रमाणापेक्षा कमी होते, तसेच ते आर्यन खानसाठीच होते हेही तपासात कुठेही सिद्ध झालं नाही. समीर वानखेडे यांच्या भुमिकेवर या प्रकरणानंतर प्रश्नचिन्ह उभे राहीले होते. त्यानंतर त्यांच्या एनसीबीमधील सेवा खंडीत करुन बदली करण्यात आली आहे.

Updated : 2 March 2022 11:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top