Home > News Update > #RheaChakraborty : Sushant Singh प्रकरणात रिया चक्रवर्तीचा पाय खोलात

#RheaChakraborty : Sushant Singh प्रकरणात रिया चक्रवर्तीचा पाय खोलात

#RheaChakraborty :   Sushant Singh  प्रकरणात रिया चक्रवर्तीचा पाय खोलात
X

अभिनेता Sushant Singh याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणखी अडचणीत आली आहे. सुशांत सिंह याच्यासाठी रिया चक्रवर्तीने या प्रकरणातील इतर आरोपींकडून अनेकवेळा गांजा विकत घेतला होता, असा दावा NCB ने आपल्या ड्राफ्ट चार्जशीटमध्ये केला आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला एकदा अटक झाली होती, सध्या ती जामिनावर आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार NCBने आपल्या चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्तीला आरोपी सॅम्युअल मिरांडा, आरोपी दीपेश सावंत, शोविक चक्रवर्ती यांनी अनेकवेळा गांजा आणून दिला. त्याबदल्यात रिया चक्रवर्ती सुशांत सिंहकडून त्यांना पैसे देत होती, अशीही माहिती या चार्जशीटमध्ये देण्यात आली आहे.

तर याचप्रकरणात NCBने आणखी गंभीर आरोप केल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात देण्यात आली आहे. या प्रकरणातील ३५ आरोपींनी संगनमत करुन उच्चभ्रू लोक आणि बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. या चार्जशीटनुसार सुशांत सिंह राजपूत हा २०१८पासून ड्रग्जचे सेवन करत होता. २०२०मध्ये या आरोपींनी सुशांत सिंहला ड्रग्ज पुरवले आणि एवढेच नाही तर त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी याने तर सुशांत सिंग राजपूतला ड्रग्जच्या अतिसेवनाची सवय लावली असाही आरोप NCB तर्फे करण्यात आला आहे.

Updated : 13 July 2022 9:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top