Home > News Update > Aryan Khan case : मोहित कंबोज यांच्या आरोपांना नवाब मलिक देणार उत्तर

Aryan Khan case : मोहित कंबोज यांच्या आरोपांना नवाब मलिक देणार उत्तर

Aryan Khan case : मोहित कंबोज यांच्या आरोपांना नवाब मलिक देणार उत्तर
X

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन आर्यन खान प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील हे मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. मोहित कम्बोज यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिलेले नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे, "समीर दाऊद वानखेडे यांच्या खासगी आर्मीच्या एका सदस्याने आताच एक पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल करण्याचा आणि सत्यावरुन लक्ष विचलित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. मी उद्या सत्य उघड करणार आहे." असा इशारा नवाब मलिक यांनी केला आहे.

मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणात दररोज नवनवीन आरोप केले जात आहेत. एकीकडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी या हे प्रकरण शांत होत नसल्याचं दिसून येत आहे. आर्यन खान प्रकरणाचा तपास आता तपास अधिकारी समीर वानखेडेंऐवजी दिल्ली NCB ची टीम करणार असल्याची माहिती समोर आलेली असताना, शनिवार भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरण धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुनिल पाटील यांनी रचल्याचा गंभीर आरोप कंबोज यांनी केला आहे. तसंच सुनिल पाटील राज्यात गृहविभागात बदलीचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे.

Updated : 6 Nov 2021 1:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top