Home > News Update > तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज.. असं म्हणणाऱ्या गणेश नाईकांना जितेंद्र आव्हाडांचं तडाखेबाज उत्तर

तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज.. असं म्हणणाऱ्या गणेश नाईकांना जितेंद्र आव्हाडांचं तडाखेबाज उत्तर

तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज.. असं म्हणणाऱ्या गणेश नाईकांना जितेंद्र आव्हाडांचं तडाखेबाज उत्तर
X

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी चे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात वाक्‌युद्धाला सुरुवात झाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना करोना व्हायरसचे ब्रँड अम्बेसिडर करा, नाईक हे खंडणीबहाद्दर आहेत, आसा आरोप केला होता. त्यावर गणेश नाईक यांनी मी खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे द्या आणि गुन्हा दाखल करा, असा पलटवार करत

'ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक, असा फिल्मी डायलॉगचा वापर करत गणेश नाईक यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला होता. त्याला आता आव्हाड यांनी लागोपाठ दोन ते तीन ट्विट करत गणेश नाईकांवर निशाणा साधलाय.

गणेश नाईक यांच्या रक्तात गद्दारी असल्याचे ट्विट त्यांनी केले आहेत.

आव्हाड यांनी ट्विट केलेल्य़ा दोन ट्विट पैकी पहिल्या ट्विटमध्ये नाईक यांना त्यांनी शिवसेना का सोडली याची आठवण करुन दिली आहे...

गणेश नाईकांना 1990 साली समाजामध्ये प्रतिष्ठा व मान सन्मान मिळवून दिला तो स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांच्याशी 1999 साली नाईकांनी गद्दारी केली. त्यानंतर 2014 पर्यंत त्यांना सांभाळून धरलं व सगळ्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून दिल्या त्या पवार साहेबांनी.

आणि दुसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी शहा आणि मोदी हे गुंड आहेत आणि लुटारू आहेत. ते देशातून पळून जातील असं म्हणणारे गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी इमानदार राहतील. गद्दारी रक्तात आहे. असं म्हणत निशाणा साधला आहे.

2014 लाच त्यांच्या मनात गद्दारीचा विचार आला आणि 2019 ला तो जुळून आला.

शहा आणि मोदी हे गुंड आहेत आणि लुटारू आहेत ते देशातून पळून जातील असं म्हणणारे गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी इमानदार राहतील.

गद्दारी रक्तात आहे #गद्दार_गणेशनाईक

Updated : 9 March 2020 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top