Home > News Update > नवी मुंबईत पाण्याचा गैरवापर, 333 सोसायट्यांना महापालिकेची नोटीस

नवी मुंबईत पाण्याचा गैरवापर, 333 सोसायट्यांना महापालिकेची नोटीस

सुनियोजित सुंदर शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेची (Navi Mumbai Mahapalika) ओळख आहे. यासाठी पालिकेला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. नवी मुंबई परिसरात पावसाळ्या अगोदरच पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यानं, महापालिकेने यावर उपाययोजना करत कारवाईला सुरूवात केलीय.

नवी मुंबईत पाण्याचा गैरवापर, 333 सोसायट्यांना महापालिकेची नोटीस
X

नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या धुणे, नळ चालू ठेवणे, तसेच पाण्याच्या टाक्या ओवर फुल होऊण वाहत राहणे, असे प्रकार वारंवार घडतांना दिसून येत आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. पनवेल तसेच नवी मुंबई परीसरात मोरबे धरणामधुन पाणीपुरवठा करण्यात येते. सध्या धरणामध्ये 32 टक्के पाणी शिल्लक असून, त्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याची निष्कारण उधळपट्टी करणाऱ्या निवासी सोसायट्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

वाशी (Vashi) 75, कोपरखैरणे (Koparkhairane) 55, तुर्भे (Turbhe) 10, बेलापूर (Belapur) 60, नेरूळ (Nerul) 15, घनसोली (Ghansoli) 30 , ऐरोली (Airoli) 08, दिघा (Digha) 80 अशा अतापर्यंत 333 सोसायट्यांना नोटीसा दिल्या आहेत. नवी मुंबईकरांना पाणी वापरण्यासाठी पालिकेने पाणीपुरवठा ठरवून दिलेला आहे. त्यामुळे जास्त पाणी वापरल्यास त्यांच्यावर प्रशासन कारवाई करत असत , अशाच प्रकारे 333 सोसायट्यांवर प्रशासन कारवाई करत आहे.

Updated : 24 May 2023 7:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top