Home > News Update > सांस्कृतिक कलगुणांची शान : नवी मुंबई फेस्ट- २०२३

सांस्कृतिक कलगुणांची शान : नवी मुंबई फेस्ट- २०२३

सांस्कृतिक कलगुणांची शान : नवी मुंबई फेस्ट- २०२३
X

नवी मुंबई फेस्टला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. भारतातील विविध राज्यांमधून आलेल्या कलावंतांनी फेस्ट मध्ये सहभागी होऊन आपली कला सादर केली. विविधतेमध्ये एकता अशी भारताची ओळख जगाला आहे. त्यातूनच भारतातील विविध राज्यांची ओळख सर्वांना व्हावी, या हेतूनं फेस्टचं आयोजन करण्यात आलंय.

या फेस्ट मध्ये संस्कृती, कला आणि विविध परंपरा जपणारे उपक्रम राबवण्यात आले होते. त्यामुळं नवी मुंबई शहराची ओळख आता सांस्कृतिक केंद्र बनत चाललीय, असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी काढले.

देशभरातून एखाद्या फेस्टमध्ये तब्बल २९ राज्यांमधील स्पर्धकांनी सहभाग घेण्याचा बहुमान नवी मुंबई फेस्टला मिळालाय. या स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरयांच्या हस्ते बेलापुर येथील दी पार्क हॉटेल मध्ये करण्यात आले.

या महोत्सवाच्या घटना प्रसंगी भारताची एकात्मता जपली जाईल याचे भान ठेऊन देशातील विविध राज्यातील सदस्यांनी आपआपल्या बोली- भाषेतून सगळ्यांचे स्वागत केले. नवी मुंबई सारख्या अनेक विकसित शहरात हा उपक्रम राबविला पहिजे, नवी मुंबई मध्ये अश्या फेस्टिवलचे आयोजन केल्याने नवी मुंबई चे आकर्षण वाढले आहे. आणि याच खूप कौतुक वाटत अस नार्वेकर म्हणाले.

Updated : 31 Jan 2023 12:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top