Home > News Update > नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड प्रत्युत्तर

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड प्रत्युत्तर

“तुम्ही स्वत:ला काय छत्रपती समजता का?” या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचे म्हटले होते.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड प्रत्युत्तर
X

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून भाजपने राज्य सरकार सोबतच महाराष्ट्र पोलिसांवर सडकून टीका केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांवर गंभीर आरोप केला होता.ठाकरे सरकारच्या दबावाखाली पोलीस अधिकारी काम करत असल्याचं म्हणत तुम्ही स्वत:ला काय छत्रपती समजता का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना विचारला होता. त्यावर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते खूप सुज्ञान आहेत. त्यांना कायद्याचा अभ्यास आहे. माझं त्यांना कोणतंही चॅलेंज नाही. उलट माझं ज्ञान थोडं आहे. मात्र, माझ्या शिकवणीनुसार मी काढलेला आदेश चुकीचा असेल तर, संविधानाच्या 226 आणि 227 कलमानुसार न्यायालयात जाऊन शहानिशा करू शकता, असं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी म्हटलं आहे.

सोबतच दीपक पांडे यांनी 'मी माझ्या निर्णयावर ठाम आहे' असं म्हटलं आहे. प्रोटोकॉलनुसार मंत्रीमहोद्यांनी आदरपूर्वक वागलं पाहिजे अशी आमची भुमिका आहे. त्यांनी शिस्त पाळली पाहिजे. मंत्रीमहोद्यांचा सन्मान झाला आणि या पुढेही करू, असंही दीपक कुमार यांनी म्हटलं आहे.

एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटेकवरून राजकीय वातावरण तापलं असतांना आणि राजकीय चेखलफेक सुरू असतांना या प्रकरणात पोलीस यंत्रणेवर देखील टीका होत आहे. या टीकेला आता पोलिसांकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात असल्याने वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा पोलिसांना सुचना देतांनाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपकडून जोरदार हल्ला चढवला जात आहे, परब यांनी पोलिसांवर अटकेच्या कारवाईसाठी दबाव टाकल्याचे भाजपचे म्हणणे आहे. याबाबत अनिल परब यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे देखील भाजपने म्हटले आहे.

Updated : 25 Aug 2021 4:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top