गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

२००२ रोजी गुजरात मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. २००२ मध्ये गुजरात येथे झालेल्या दंगली चा अभ्यासासाठी नानावटी-मेहता आयोगाची नेमणूक केली होती.

आज या आयोगाचा अहवाल गुजरात विधानसभेत सादर करण्यात आला. यामध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मंत्र्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

हे ही वाचा
गांधीजी आम्हाला माफ करा – हेमंत देसाई
अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकतं माप ! कोणत्या पक्षाकडं असणार कोणतं खातं?

राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी विधानसभेत अहवाल सादर केला. ‘गोध्रा ट्रेन जळाल्यानंतर झालेल्या दंगली या पूर्वनियोजित नव्हत्या,’ असं आयोगानं आपल्या अहवालात म्हटलं आहे.