Home > News Update > माझ्याकडे पुराव्या सकट १०५ प्रकरणं आहेत ; राणेंची ठाकरेंवर जोरदार टीका

माझ्याकडे पुराव्या सकट १०५ प्रकरणं आहेत ; राणेंची ठाकरेंवर जोरदार टीका

माझ्याकडे पुराव्या सकट १०५ प्रकरणं आहेत ; राणेंची ठाकरेंवर जोरदार टीका
X

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. मातोश्रीवरील अनेक किस्से राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकेर यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईत 'शिवसेना लोकाधिकार आणि मी' या गजानन कीर्तिकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

'शिवसेना लोकाधिकार आणि मी' या खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या पुस्तकाच प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, या पुस्तकामध्ये ५७ वर्षांचा शिवसेनेचा इतिहास लिहिला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी हे जरुर वाचावं. माझाही पुस्तकात उल्लेख केला असून आम्ही सुरुवातीपासूनच शिवसेनेते होतो. शिवसेनेत आलो तेव्हा मी १५ वर्षाचा होतो. दुसऱ्या मुलाला पुढे करत त्याचं नाव नारायण राणे सांगून मी शिवसैनिक झालो, कारण मी लहान होतो अन् हाईट पण कमी होती. मी १८ वर्षे क्रॉस केल्यानंतर मला आयकर विभागात नोकरी मिळाली. शिवसेना जन्माला आली तेव्हा उद्धव ठाकरे ८ वर्षांचे होते. तेव्हा रुमाल पण सोबत नव्हता त्यांच्या. कोणी एकाने सांगावं की, त्यांनी कोणत्या आंदोलनात भाग घेतला. कधी शिवसेना जिंदाबाद असं तरी म्हटलंय का? असा टोला राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना राणे पुढे म्हणाले की, ते सध्या खोक्यांचे आरोप करत आहेत. परंतु माझ्याकडे पुराव्या सकट १०५ प्रकरणं आहेत. जी माणसं मातोश्रीवर पैसे घेऊन गेले त्यांची माहिती आहे. काही माणसं आता पण इथे आहेत. आता कोरोना काळात औषधांवर १५ टक्के कमिशन कोणी घेतले? सांगा नाहीतर मी सांगतो. अशी घणाघाती टीका नाराय राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.


Updated : 3 Sep 2023 3:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top