Home > News Update > नारायण राणे यांना जामीन मंजूर

नारायण राणे यांना जामीन मंजूर

नारायण राणे यांना जामीन मंजूर narayan rane gets bail from mahad court

नारायण राणे यांना जामीन मंजूर
X

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली म्हणून राणे यांना अटक करण्यात आली होती. रत्नागिरी कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी नारायण राणे यांना अटक केली होती. त्यानंतर राणे यांना पोलिसांनी महाड येथे गुन्हा दाखल असल्याने महाड न्यायालयात हजर केले.

महाडच्या न्यायालयात बराच वेळ नारायण राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. तपोलिसांनी राणे यांना 7 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. पण रखणे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने राणे यांना जामीन मंजूर केला. यामुळे जेलमध्ये रात्री काढण्याची वेळ टळली.

महाडमध्ये पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे यांची जीभ घसरली होती.

शिवसेनेने ज्यभर आंदोलनं केली. तर भाजपा कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.राणे यांना जामीन मंजूर झाल्याने आआ जन आशीर्वाद यात्रा सुरु राहील असे दिसते आहे.

जामीनावर सुटका झाल्यावर राणे यांनी सत्यमेव जयते असे ट्विट केले आहे. त्यामुळे जन आशीर्वाद यात्रेत पुढे राणे काय उत्तर देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 24 Aug 2021 7:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top