Home > News Update > ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात, दीदींच्या 2 मंत्र्यांना अटक

ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात, दीदींच्या 2 मंत्र्यांना अटक

पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण तापलं, ममता बॅनर्जींच्या दोन मंत्र्यांना अटक, दीदी सीबीआय कार्यालयात, काय आहे प्रकरण?

ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात, दीदींच्या 2 मंत्र्यांना अटक
X

पश्चिम बंगालचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. पश्चिम बंगालचे मंत्री फरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी यांना नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणात कोलकाता सीबीआयने अटक केली आहे.

त्या अगोदरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात पोहोचल्या यावेळी ममता बॅनर्जी यांच्या सोबत त्यांचे वकील देखील सोबत होते. ममता बॅनर्जी यांच्या या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार ममता यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना मलाही अटक करा. असं आव्हानचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे.

आज सकाळी नारद स्टिंग प्रकरणात तृणमूल कॉग्रेसच्या दोन मंत्र्यांना आणि एका आमदारासह माजी मंत्री शोभन चॅटर्जी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआई) ने या मंत्र्यांना पश्चिम बंगालमधील निजाम पॅलेसच्या कार्यालयात घेऊन गेले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने सीबीआई ची एक टीम सोमवारी सकाळी हाकिम यांच्या चेतला निवास स्थानी पोहोचली. आणि त्यांना चौकशीसाठी कार्यालयात घेऊन गेली.

दरम्यान राज्यपाल जगदीप धनखर यांनी सीबीआयला या नेत्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी दिली होती. मात्र, राज्यपाल अशा प्रकारे परवानगी देऊ शकतात का? तसंच विधानसभा अध्यक्षांकडून अशी परवानगी घेण्यात आली आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या संदर्भात पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री हाकिम यांनी माध्यमांशी बातचीत केली. ''सीबीआई ने नारद प्रकरणात मला अटक केली आहे. आम्ही हे प्रकरण आता न्यायालयात घेऊन जाऊ''.

अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

काय आहे प्रकरण?

नारदा स्टिंग प्रकरणात फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी तसंच टीएमसीचे आमदार मदन मित्रा आणि भाजपचे नेते शोभन चॅटर्जी यांचा समावेश आहे.

हे चारही व्यक्ती 2014 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या कॅबिनेट मध्ये मंत्री होते. तेव्हा हे कथित टेप रेकॉर्ड करण्यात आले होते.

आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

नारद स्टिंग टेप पश्चिम बंगालच्या 2016 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सार्वजनिक करण्यात आले होते. या संदर्भात असा दावा केला जातो की ही कथित टेप 2014 मध्ये तयार करण्यात आली असून यामध्ये टीएमसी चे मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासारखे लोक दिसत असून या कथित टेपमध्ये पैश्याची देवान घेवान होत आहे.

हे कथित स्टिंग ऑपरेशन नारद न्यूज पोर्टल चे मैथ्यू सैमुअल ने केलं होतं. कोलकाता उच्च न्यायालयाने मार्च, 2017 ला या स्टिंग ऑपरेशनच्या चौकशीचे आदेश सीबीआईला दिले होते.

दरम्यान याच प्रकरणात भाजप नेते मुकुल रॉय आणि शुभेंदू अधिकारी यांना अटक का करण्यात आली नाही? असा सवाल टीएमसीने व्यक्त केली आहे.

Updated : 17 May 2021 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top