Home > News Update > नांदेड: शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी शिक्षक फरार

नांदेड: शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी शिक्षक फरार

नांदेड: शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी शिक्षक फरार
X

शिक्षक- विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडलीये. सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणात शिक्षकासह पाच जणांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केलेत. बिलोली तालुक्यातील एका गावातल्या शाळेत ही घटना घडली आहे. या निषेधार्थ काल बंद पुकारण्यात आला होता.

दोन महिन्यापुर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ दाखवतो म्हणून दोन शिक्षकांनी या मुलीला एका खोलीत नेलं. मात्र प्रत्यक्षात अश्लीश व्हिडिओ दाखवून या मुलीवर या शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केले. रसूल सय्यद आणि दयानंद राजुळे असं या आरोपी शिक्षकांची नाव आहेत.

घडलेला सर्व प्रकार या मुलीने आपल्या आईला सांगीतला. पीडित आई तक्रार करायला शाळा प्रशासनाकडे गेली. मात्र विधवा असलेल्या या तक्रारकर्त्या आईवरचं शाळा प्रशासनानं शांत राहण्यासाठी दबाव टाकला. तक्रार न स्विकारता या महिलेला घरी पाठवण्यात आलं. मुलीची बदनामी होईल या भीतीने पीडित मुलीची आई गप्प बसली.

मात्र गेल्या काही दिवसापासून या अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडली. या मुलीवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी आवाज उठवला. त्यानंतर नांदेडच्या रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांनी या दोन शिक्षक या घटनेची माहिती न देणाऱ्या प्राचार्य, मुख्याध्यापक आणि अन्य एक महिला अशा ५ जणाविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. मात्र हे सर्वच्या सर्व फरार झाले आहेत. या आरोपींचा शोध सुरु आहे.

या पीड़ित मुलीची प्रकृर्ती खालावली असून, तीला मोठा मानसिक धक्का बसल्याचं डॉक्टरांनी सांगीतलय. ही शाळा एका माजी खासदाराच्या संस्थेमार्फत चालवली जाते. त्यामुळे राजकीय दबावामुळे पोलीस योग्य तपास करीत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.

Updated : 20 Jan 2020 3:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top