Home > News Update > भावी डॉक्टर तरुणीच्या ऑनर किलींगच्या घटनेने नांदेड हादरले.

भावी डॉक्टर तरुणीच्या ऑनर किलींगच्या घटनेने नांदेड हादरले.

भावी डॉक्टर तरुणीच्या ऑनर किलींगच्या घटनेने नांदेड हादरले.
X

महाराष्ट्राला हादरविणारी घटना नांदेड येथे घडली आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका २३ वर्षीय तरुणीची कुटूंबियांकडूनच हत्या करण्यात आली आहे. नांदेडपासून जवळच असलेल्या महिपाल पिंपरी या गावातील बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या शुभांगी जोगदंड या तरुणीचे गावातील एका तरुणाशी प्रेम होते. आपली मुलगी दुसऱ्या मुलावर प्रेम करत आहे. ही गोष्टच या गावातील जोगदंड परिवाराला मान्य नव्हती. मुलीची अन्य मुलाशी सोयरिक झाली होती. साखरपुडाही झाला होता. पण मुलीचे गावातील एका मुलावर प्रेम असल्यामुळे मित्राच्या मदतीने हे लग्न रद्द केले . लग्न रद्द झाले. गावात असलेल्या तथाकथित सन्मानाला ठेच लागली म्हा राग मनात ठेवून रविवारी दि.२२ रोजी कुटुंबीयांनी गळा दाबून पोटच्या मुलीची हत्या केली. पुरावे लपविण्यासाठी आपल्याच शेतात तिच्यावर अंत्यसंस्कार करून तिची राख जवळच ३ किमी अंतरावरील हिवरा येथील नाल्यात टाकली.. आणि त्यानंतर जसे काही घडलेच नाही या अविर्भावात हे संपूर्ण वागत होते. हे कुटुंब आपल्या कामात व्यस्त असल्याचा भास दाखवीत होते.

गावात मुलगी दिसत नाही, अशी कुणकुण लागल्यावर काही लोकांनी पोलीस स्थानकाशी संपर्क केला असता २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता लिंबगाव पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत या प्रकरणाचा छडा लावला. या तपासात मुलीची हत्या तिच्या कुटुंबियांनीच केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकारामुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीचे वडील जनार्दन जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, दोन चुलत भाऊ आणि मामा,अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..

Updated : 27 Jan 2023 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top