Home > News Update > ...तर आम्हीही किरीट सोमय्या यांना शाबासकी देऊ- नाना पटोले

...तर आम्हीही किरीट सोमय्या यांना शाबासकी देऊ- नाना पटोले

...तर आम्हीही किरीट सोमय्या यांना शाबासकी देऊ- नाना पटोले
X

किरीट सोमय्यांना त्यांच्या पक्षात किती महत्त्व दिलं जातं, हे मला चांगलंच माहित आहे. पण त्यांना जर खरंच भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचारी धेंडांना उघडं करावं. मगच त्यांना खऱ्याअर्थाने जनतेचा पाठिंबा मिळेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करून पटोले यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. दोन्ही ही बाजूने जोरदार आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे.

त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी किरीट सोमय्या यांना त्यांच्यात पक्षात किती किंमत आहे हे मला माहिती आहे, त्यांना साधं लोकसभेचं तिकीट पक्षाने दिलं नाही असं म्हणत चिमटा काढला आहे.

सोबतच त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचारि नेत्यांचे घोटाळे बाहेर काढावे म्हणजे त्यांना राज्यातील जनतेसोबत आमचीही शाबासकी मिळेल असं म्हटले आहे.

Updated : 20 Sep 2021 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top