Home > News Update > ...राज्यपालांना काढून टाकले असते, नाना पटोलेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

...राज्यपालांना काढून टाकले असते, नाना पटोलेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. त्यातच राज्यपालांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यावर केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी अधिकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला.

...राज्यपालांना काढून टाकले असते, नाना पटोलेंचा राज्यपालांवर हल्लाबोल
X

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामना रंगला आहे. त्यातच राज्यपालांनी आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांना आपले अभिभाषण अर्धवट सोडून जावे लागले होते. त्यापाठोपाठ आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

नाना पटोले ओबीसी अधिकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ज्या सावित्रीबाई फुले यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले. तसेच ज्या महात्मा फुले यांनी आपल्या कृतीतून नवा विचार पेरला. त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी राज्यपालांनी अवमानजनक वक्तव्य केले.

देशाच्या प्रमुखांना या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडा जरी आदर असता तर एका झटक्यात राज्यपालांना काढून टाकले असते. पण सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी अवमानकारक टिपण्णी करूनही राज्यपाल अजूनही पदावर आहे, अशी खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली.


Updated : 29 March 2022 6:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top