पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषण आणि कार्यासाठी वाहिलेल्या नमो टीव्ही कडे प्रसारणासंदर्भात लायसन्सच नसल्याचं उघड झालं आहे. या टीव्ही वाहिनीने कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा विषयक बाबींची पूर्तता केलेली नसून तिच्या मालकीबाबतही साशंकता आहे.
गेल्या आठवड्यापासून नमो टीव्ही चं प्रसारण सूरू असून डीटीएच प्लॅटफॉर्मवर ते दाखवण्यात येत आहे. प्रसारण कायद्यानुसार हा गुन्हा असून नमो टीव्ही कडे कसल्याच कायदेशीर मान्यता नाहीयत असं समोर आलं आहे.
माहिती प्रसारण खात्याने जारी केलेल्या यादीत नमो टीव्हीचं नाव नाहीय, त्याच बरोबरीने या टीव्हीने कधीच प्रसारणाबाबत लायसन्स साठी अर्ज केलेला नाही, असं असतानाही या चॅनेलचं प्रसारण होणं हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक असून लवकरच डीटीएच कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
एखादं चॅनेल प्रसारित करायचं असेल तर माहिती प्रसारण खातं, संरक्षण खातं तसंच इतर अनेक एजन्सीकडून खातरजमा केली जाते. थेट पंतप्रधानांचं नाव घेऊन सुरू असलेल्या या चॅनेलने राष्ट्रीय सुरक्षेसमोरच नवीन प्रश्नचिन्ह उभं केलं आहे
Updated : 4 April 2019 4:56 AM GMT
Next Story