Home > News Update > वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांची आगळीवेगळी मोहीम

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांची आगळीवेगळी मोहीम

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांची आगळीवेगळी मोहीम
X

नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी आगळीवेगळी मोहीम हाती घेतली आहे. नागपूर पोलिसांनी शहरातील तब्बल 19 हजार रिक्षा चालकांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्याचे काम हाती घेतले आहे. नागपूर पोलिसांच्या तपासणीच्या पहिल्या टप्यात 300 पेक्षा जास्त रिक्षाचालकांवर वेगवेगळे गुन्हे असल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच वाहतुकीचे नियम वारंवार तोडणाऱ्या रिक्षाचालकांसह इतर वाहन चालकांचे रेकॉर्डदेखील तपासले जाणार आहे. या सर्वांचा वाहन परवाना निलंबित केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नागपूरातील गुन्हेगारी आळा घालण्यासाठी सर्वात आधी रिक्षा चालकांना शिस्त लावण्याची गरज असल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नोंदणीकृत 19 हजार रिक्षाचालकांचे रेकॉर्ड तपासण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नागपूर पोलिसांच्या या मोहिमेमुळे वाढत्या गुन्ह्यांना आळा बसू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Updated : 21 Sep 2021 12:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top