कोरोनाचे नियम पाळा अन्यथा…..- तुकाराम मुंढे

37

नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा हा आता 7310 वर जाऊन पोहोचला आहे, नागपुर शहरात मागील 24 तासात 558 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर बुधवारी देखील शहरात एकाच दिवशी 15 कोविड रुग्णांचा मृत्यु झाला आहे. शहरात कोरोनाबाधित मृतांचा आकड़ा 204 वर पोहोचला आहे.

नागरिक अनलॉक बिगेनचा फायदा उचलून कोविड संदर्भात बनवण्यात आलेले नियम पाळत नसल्याने शहरात दिवसागणिक कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.जर नागरिक अशाच पद्धतीने नियम तोडून शहरात वावरतील तर शहरात कोरोना रुग्णांचा उद्रेक आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंढे यांनी नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments