Home > News Update > वाढीव वीज बिलांवरुन महाविकास आघाडीतच नाराजी

वाढीव वीज बिलांवरुन महाविकास आघाडीतच नाराजी

वाढीव वीज बिलांवरुन महाविकास आघाडीतच नाराजी
X

लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलांमध्ये सवलत न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आता महाविकास आघाडीतच मतभेद निर्माण झाले आहत. इतर गोष्टींवर खर्च करायला सरकारकडे पैसा आहे पण वीज बिलांमध्ये माफी देण्यास पैसा नाही या शब्दात राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास करू नका आणि वीज बल संदर्भातील मदत राज्य सरकारला द्यावीच लागेल अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असला तरी सामान्य जनतेसोबत राहू, वेळ पडली तर रस्त्यावर उतरु पण महाविकास आघाडी सरकारचा कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Updated : 11 March 2021 2:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top