Home > News Update > #SulliDeals ; मुस्लीम महिला ऑनलाइन विक्रीला, ट्रोलिंगचा नवा प्रकार

#SulliDeals ; मुस्लीम महिला ऑनलाइन विक्रीला, ट्रोलिंगचा नवा प्रकार

#SulliDeals ; मुस्लीम महिला ऑनलाइन विक्रीला, ट्रोलिंगचा नवा प्रकार
X

नवी दिल्ली: सोशल मिडियावर महिलांना 'ट्रोल' करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पण आता एका विशिष्ट समाजातील महिलांना 'ट्रोल' (troll )करून, त्यांची बदनामी करण्याच्या घटना समोर येत आहे. ट्विटर आणि काही सोशल साईडवर सद्या 'सुल्ली डील्स' ( #SulliDeals ) हा शब्द चर्चेचा विषय बनला असून, या माध्यमातून मुस्लीम महिलांना टार्गेट करून, त्यांची बदनामी केली जात आहे.

शेकडो मुस्लिम महिलांचे छायाचित्र 'सुल्ली डील्स' ( #SulliDeals ) नावाने 4 जुलै रोजी एका अ‍ॅपवर अपलोड करण्यात आले. ही छायाचित्रे अपलोड कोणी केले हे अद्याप उघडकीस आली नाही, पण सुल्ला किंवा सुल्ली हा मुस्लीम समाजातील एक अपमानजनक शब्द आहे, जो मुस्लिमांसाठी वापरला जातो.

हे अ‍ॅप तेव्हा समोर आले, जेव्हा लोकांनी ट्विटरवर 'डील ऑफ द डे' (deal of the day)(आजच्या दिवसाची विक्री) शेअर करताना वरील महिलांना टॅग करत, त्यांची माहिती शेअर केली. या अ‍ॅपमध्ये वापरल्या जाणार्‍या मुस्लिम महिलांची माहिती ट्विटरवरून घेण्यात आली आहे. यात 80 हून अधिक महिलांची छायाचित्रे, त्यांची नावे आणि ट्विटर हँडलची माहिती देण्यात आली आहे. तसेच या अ‍ॅपच्या वरच्या बाजूला 'फाइंड योर सुल्ली डील' (find your #SulliDeals ) असे लिहिलेलं होते.

Updated : 12 July 2021 12:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top