Home > News Update > नुपूर शर्मा प्रकरणी मुस्लिम समाज आक्रमक, देशभरात निदर्शने

नुपूर शर्मा प्रकरणी मुस्लिम समाज आक्रमक, देशभरात निदर्शने

नुपूर शर्मा प्रकरणी मुस्लिम समाज आक्रमक, देशभरात निदर्शने
X

नुपूर शर्मा प्रकरणी मुस्लिम समाज आक्रमक, देशभरात निदर्शने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटले. तर त्यानंतर आता नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी मुस्लिम समाजाने देशभरात तीव्र निदर्शने व्यक्त केले आहेत.

भाजपच्या तात्कालिन राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता देशभरात नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्या अटकेची मागणी करत मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे.

औरंगाबाद येथे मुस्लिम समाजाची निदर्शने

नुपूर शर्मा प्रकरणी औरंगाबाद शहरातही मुस्लिम समाजाने MIM खासदार इम्तियाज जलील यांच्या नेततृत्वाखाली विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने केली. यावेळी भाजपच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

नुपूर शर्माच्या अटकेची मागणी करत साताऱ्यात निदर्शने

नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांनी प्रेषित पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने जगभरातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांना तातडीने अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.

जळगावमध्येही मुस्लिम समाजाची निदर्शने

नुपूर शर्मा प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे निदर्शने करण्यात आली. तर नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्या अटकेची मागणी यावेळी करण्यात आली. तर यासंदर्भातील निवेदन पाचोरा येथील नायब तहसिलदार आणि पोलिस उपनिरीक्षक यांना देण्यात आले.

बीड जिल्ह्यातही इमाम कौन्सिलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथेही मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत. तर सोशल मीडियावर बंदची हाक देण्यात आली होती. मात्र जालना जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा बंद पाळण्यात येणार नसल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आले. तर निदर्शन करतांना पोलिस अधिक्षकांच्या समोर मोठा जमाव आल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला होता. मात्र याठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.

नुपूर शर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कर वर्धा, सोलापूर, सांगली, पनवेल याठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तर माकपने सोलापुरमध्ये मोर्चा काढला होता.

राज्यात सौम्य निदर्शने- दिलीप वळसे पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करणारे सौम्य निदर्शने पार करण्यात आल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगिलते.

दिल्लीत काय घडलं?

नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दिल्लीतही मुस्लिम समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मात्र दिल्लीतील जामा मशीद परिसरातही या वक्तव्याचे पडसाद उमटले. यावेळी मुस्लिम समाजाने निदर्शने केली. परंतू या निदर्शनांसाठी जामा मशिद ट्रस्टतर्फे कोणत्याही प्रकारचे आवाहन करण्यात आले नसल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. तसेच यावेळी विनापरवाना निदर्शने केल्याप्रकरणी निदर्शकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

उत्तरप्रदेशातही निदर्शने

उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये नमाजनंतर मुस्लिम समाज एकत्र येत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. तर यावेळी काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे जिल्हा पोलिस अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले.

झारखंड मध्ये निदर्शकांनी जाळपोळ केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. तर कर्नाटकमध्येही मुस्लिम समाजाने निदर्शने केली आहेत.

Updated : 10 Jun 2022 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top