Home > News Update > मॅगसेसे विजेते प्रसिद्ध संगीतकार टीएम कृष्णा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार...

मॅगसेसे विजेते प्रसिद्ध संगीतकार टीएम कृष्णा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार...

मॅगसेसे विजेते प्रसिद्ध संगीतकार टीएम कृष्णा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार...
X

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेचा आज शनिवारी 11 वा दिवस आहे. ही यात्रा सध्या आगर-माळवा जिल्ह्यात आहे. काशीबर्डिया येथे रात्रीच्या विश्रांतीनंतर महुद्या बसस्थानकावरून सकाळी यात्रेला सुरुवात झाली. सकाळी 10.30 वाजता आमला शिवाय हॉटेलसमोर मॉर्निंग ब्रेक असणार आहे. यानंतर जैन मंदिर सुसनेर येथून दुपारी ४ वाजता यात्रेला सुरुवात होईल. यात्रेचा संध्याकाळचा ब्रेक मंगेशपुरा चौक या ठिकाणी असेल.

अन्नपूर्णा ढाब्याजवळील लालखेडी येथे रात्रीचा मुक्काम होईल. रविवारी सकाळी ६ वाजता कॅम्पस साईटपासून सुरुवात करून सकाळी १० वाजता मुलींच्या वसतिगृहाजवळ सोयकला आगर येथे ब्रेक होईल. त्यानंतर हि यात्रा राजस्थान मध्ये प्रवेश करेल. रात्रीचा मुक्काम सायंकाळी ७ वाजता पिपलेश्वर बालाजी मंदिर, डोंगरगाव मार्गे राजस्थानमध्ये होईल.आज सकाळी राहुल गांधी यांनी दिव्यांगांचीही भेट घेतली. त्यानंतर दक्षिणेतील प्रसिद्ध संगीतकार टीएम कृष्णा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामासाठी त्यांना या पूर्वी मॅगसेसे आणि इंदिरा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आगर जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी टीएम कृष्णा रात्री उशिरा इंदूरला पोहोचले.

Updated : 3 Dec 2022 7:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top