Home > News Update > औरंगाबाद: प्राध्यापकाचा राहत्या घरात गळा चिरून खून; घटनास्थळी पोलीस आयुक्तांची पाहणी

औरंगाबाद: प्राध्यापकाचा राहत्या घरात गळा चिरून खून; घटनास्थळी पोलीस आयुक्तांची पाहणी

औरंगाबाद: प्राध्यापकाचा राहत्या घरात गळा चिरून खून; घटनास्थळी पोलीस आयुक्तांची पाहणी
X

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापकाचा राहत्या घरी गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सिडको एन-2 भागात घडली आहे. ही घटना पहाटे 5 वाजता उजेडात आली असून खून झालेल्या प्राध्यापकाचे नाव डॉ. राजन शिंदे असे आहे. घटनास्थळी पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.

राजन शिंदे हे मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी हा विषय शिकत होते. आज पहाटे शिंदे यांचे कुटुंबीय झोपेतून उठले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर राजन शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेले दिसून आले. राजन शिंदे यांच्या कुटुंबीयांनी सदरील घटनेची माहिती तात्काळ पोलिसांनी कळवली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

पोलीस आयुक्त घटनास्थळी

घटनेची गांभीर्या लक्षात घेत औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली असून, अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेत पुढील तपसाबाबत सूचना दिल्या आहे.

Updated : 2021-10-11T15:08:11+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top