Home > News Update > हिमायतनगर बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुणाची हत्या

हिमायतनगर बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुणाची हत्या

हिमायतनगर बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुणाची हत्या
X

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील बसस्थानक परीसरात काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयीन तरुणास धारदार शस्त्राने भोसकून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली.हत्येचा हा थरार CCTV कॅमऱ्यात कैद झाला आहे.

यश उत्तम मिराशे (वय १७ वर्ष) रा. कारला पी .असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून या घटनेत एकजण जखमी आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे हिमायतनगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेमुळे ग्रामिण भागातुन शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या पालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान ही हत्या महाविद्यालयातील गटबाजीवरून आणि वर्चस्वातून झाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली आहे.दरम्यान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली व मयताच्या नातेवाइकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Updated : 12 Sep 2021 6:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top