Home > News Update > मुंबई ठाण्यासह उपनगरात बत्तीगुल

मुंबई ठाण्यासह उपनगरात बत्तीगुल

राज्यातील भारनियमनाचं(Loadshedding) संकट दुर होत आहे, असं वाटत असतानाच आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईसहीत (mumbai)उपनगरांमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या ४०० केव्हीच्या पारेषण वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळतेय.सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबई आणि ठाणे (Thane)डोंबवलीमध्ये (Dombivali)अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

मुंबई ठाण्यासह उपनगरात बत्तीगुल
X

कळवा पडघा येथील वीजपुरवठा केंद्रामध्ये हा बिघाड झाला.त्यामुळे दादर,माहीम,वांद्रे,सांताक्रुझ आणि इतर भागांमधील वीजपुरवठा खंडीत झाला.ठाणे आणि कळव्यामध्येही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला.वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम हाती घेण्यात आलं असून वीजपुरवठा खंडीत झालेल्या भागांमध्ये टप्प्याटप्प्यांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरु आहे.

महापारेषणच्या पडघा येथील उच्च दाब वीजवाहिनीत बिघाड झाल्याने डोंबिवली, कल्याण तसेच बदलापूर अंबरनाथ शहरांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता.तसेच कुर्ला,चेंबूर, वाशीसहीत पालघरमधील संपूर्ण विभागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.पडघा पालघर तसेच अंबरनाथ बदलापुर मध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

Updated : 26 April 2022 12:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top