Home > News Update > ...तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुंबई बाबत वादग्रस्त वक्तव्य

...तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुंबई बाबत वादग्रस्त वक्तव्य

...तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुंबई बाबत वादग्रस्त वक्तव्य
X

सातत्याने गेल्या काही काळापासून राज्यपाल भगत सिंह कोष्यारी हे वादग्रस्त वक्तव्य करत आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी मुंबई संदर्भात आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

एका कार्यक्रमात बोलत असताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी, "महाराष्ट्रात मी लोकांना सांगत असतो. की मुंबई ठाण्यातून गुजराती आणि मारवाडी ‌‌‌‌‌‌निघाले तर ‌‌‌‌‌‌‌‌‌मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही." असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. असं बोलुन राज्यपालांना काय साध्य करायचे आहे हा प्रश्न उपस्थित होतो.

गेल्या काही वर्षांत अनेकदा मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या तयारीत ‌‌‌‌‌‌केंद्र सरकार आहे अशा‌ चर्चा सुरु‌ आहेत. राज्यपालांचं वक्तव्य म्हणजे त्या दिशेने सुरु झालेली वाटचाल तर नाही ना.... कारण त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यात नवे वादंग उठण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष या प्रकरणी आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांना कठोर टीका केली आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, " राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे."

याशिवाय आता खासदार संजय राऊत यांनी सुध्दा राज्यपालांवर‌ ट्विट करत टीका केली आहे. ते म्हणतात, "काय ती झाडी..

काय तो डोंगर..

काय नदी..

आणि आता...

काय हा मराठी माणूस ..

महाराष्ट्राचा घोर अपमान!

50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत..

जय महाराष्ट्र..."

राज्य सरकारची आता या प्रकरणी काय भूमिका असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 30 July 2022 3:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top