Home > News Update > रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधील अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण रद्द

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधील अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण रद्द

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधील अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण रद्द
X

मुंबई विद्यापीठानं संघ विचारांच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आयोजित केलेला अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग काँग्रेसच्या आक्षेपानंतर बंद केलाय. यावरुन आता भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) असा संघर्ष सुरू झालाय.विद्यापीठातील उपकुलसचिव, सहाय्यक उपकुलसचिव यांच्यासह वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत शुक्रवारपासून सुरू झाले होते.

पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या संस्थेत असे प्रशिक्षण शिबिर घेण्यास काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी विरोध केला. त्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हे प्रशिक्षण तातडीनं थांबवण्याचे आदेश दिलेत.काँग्रसेचे माजी खासदार राजीव सातव यांनी या प्रशिक्षण वर्गावर आक्षेप घेत ते रद्द करण्याची मागणी केली होती.

“मा.उदय सामंत जी, मला हे कागद आत्ताच प्राप्त झाले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये मुंबई विद्यापिठातील काही वरिष्ठ कर्मचा-यांचे ट्रेनिंग होत आहे. आपल्याला याची कल्पना नसेल हे मी जाणून आहे. पण उत्तान ला अशी ट्रेनिंग होणं योग्य नाही. हे थांबलं पाहिजे.”

यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केलीये. "रझा अकादमी"च्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी "रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी" मधे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे सुरु असलेले प्रशिक्षण रद्द केले. ही वैचारिक अस्पृश्यता आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती या निर्णयाचा फेरविचार करा!

या सगळ्या वादानंतर एखाद्या विशिष्ट विचारसरणीशी संबंधित संस्थेत शैक्षणिक कार्यक्रम किंवा प्रशिक्षण शिबिर घेण्यात यावेत का असाही मुद्दा उपस्थित होतोय.

Updated : 3 Feb 2020 6:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top