Home > News Update > मुंबई मंदावली संततधार पावसात...

मुंबई मंदावली संततधार पावसात...

पुढील तीन ते चार तासांत, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे दिसण्याची शक्यता आहे.

मुंबई मंदावली संततधार पावसात...
X

पुढील तीन ते चार तासांत, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे दिसण्याची शक्यता आहे. बाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आयएमडी मुंबईने म्हटले आहे. सोमवारी दिवसभर प्रखर उन्हानंतर मंगळवारी सकाळी मुंबईकरांना अनपेक्षित पाऊस पडत आहे. मंगळवारी पहाटेपासूनच ठाणे, गोरेगाव, बोरिवली परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र येत्या काही तासांत हा पाऊस दादर, परळ आणि दक्षिण मुंबईच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना विजांचा कडकडाट, गडगडाट आणि पाऊस अशा परिस्थितींना सामोरे जावे लागणार. “पश्चिमी वाऱ्यांमुळे अरबी समुद्रातून गारवा येत आहे. मुंबईत सध्या हलका ते मध्यम पाऊस पडत आहे...

” प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी ट्विट करून सांगितले आहे.

मुंबईत (Mumbai rain ) सुरु असलेल्या संसतधार पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकल सेवेवर झाला आहे. मुंबईची लोकल सेवा (Mumbai Local Train Update) ही धीम्या गतीनं सुरु आहे. मध्य रेल्वे मार्गासह हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलही धीम्या गतीने सुरु आहे. दिलासादायक बाब म्हणजे रेल्वे सेवा उशिराने का होईना, सुरु आहेत.




त्यामुळे नोकरीवर जाण्यासाठी निघालेल्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सखल भागात पाणीही साचल्याचं पाहायला मिळालंय. तर दुसरीकडे नवी मुंबईतही (Navi Mumbai Rain Update) जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेच्या वेळापत्रकावरही पावसामुळे परिणाम झालाय. दरम्यान, लोकल सेवा उशिराने सुरु असल्यानं रेल्वे प्लॅटफॉर्म प्रवाशांची गर्दी वाढली आहे. पर्यायानं लोकलमध्येह नेहमीपेक्षा अधिक गर्दीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय.

Updated : 21 March 2023 7:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top