Home > News Update > सावधान मुंबईकर ! हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर

सावधान मुंबईकर ! हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर

सावधान मुंबईकर ! हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर
X

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या हवेची चर्चा देशभर सुरु होती. दिल्ली प्रदुषणाने हैराण झाली होती. आता दिल्लीपाठोपाठ मुंबईची हवाही धोक्याच्या पातळीवर आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा मोठा धोक्याचा इशारा आहे.

मुंबईतील घटणारे तापमान आणि वातावरणातील प्रदुषित घटकांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्याबरोबरच मुंबईतील प्रदुषण धोक्याच्या पातळीवर पोहचले आहे. मुंबईतील मालाड, चेंबुर, माझगाव, अंधेरी, कुलाबा या भागातील हवेत विषारी घटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळले आहे.




मुंबईतील माझगाव या भागात सर्वाधिक प्रदुषित हवेचे प्रमाण आढळून आले आहे. तसेच मुंबईतील हवेत नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. याबाबत सफर या संस्थेने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार मुंबईतील हवेत प्रदुषण वाढवणाऱ्या सुक्ष्मकणांचे प्रमाम ( झश 2.5, 10) इतके आहे. त्यामुळे या विषारी वायूंचा नागरिकांच्या श्वसनयंत्रणेवर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Updated : 21 Jan 2023 7:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top