Home > News Update > 97 हजार कोटी – 72 हजार कोटी – 25 हजार कोटी = अजित पवार क्लिन चीट

97 हजार कोटी – 72 हजार कोटी – 25 हजार कोटी = अजित पवार क्लिन चीट

97 हजार कोटी – 72 हजार कोटी – 25 हजार कोटी = अजित पवार क्लिन चीट
X

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना एसीबीने 72 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट दिली होती. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २५ हजार कोटींच्या कथित महाराष्ट्र राज्य सरकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चीट दिली आहे. सत्र न्यायालयात मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये या सर्वाना क्लिन चीट दिली आहे.

शिखर बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि कलम 467 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने पाच दिवसात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात फक्त यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचाच समावेश होता असं नाही. यामध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ, भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांचं नाव आहे.

काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी यांचे सरकार असताना अजित पवार यांच्यावर ७२ हजार कोटी रुपयांचा कथित सिंचन घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात अजित पवार यांना लाचलुचपत विभागाने क्लीन चीट दिली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या तीन दिवसांचं सरकार आल्यानंतर अजित पवार यांना क्लिन चिट देण्यात आली होती. त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या 72 हजार कोटींच्या आरोपातून अजित पवार यांची सुटका झाल्यानंतर आता 25 हजार कोटींच्या राज्यसहकारी बॅंकेच्या घोटाळ्यातून अजित पवार यांना क्लिन चीट मिळाल्यानंतर आता अजित पवार यांना 97 हजार कोटींच्या आरोपातून आता सुटका मिळाली आहे.

Updated : 8 Oct 2020 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top