Home > News Update > `रिपब्लिक`च्या अडचणीत वाढ; वितरण प्रमुख घनश्याम सिंगला मुंबई पोलिसांनी घातल्या बेड्या

`रिपब्लिक`च्या अडचणीत वाढ; वितरण प्रमुख घनश्याम सिंगला मुंबई पोलिसांनी घातल्या बेड्या

`रिपब्लिक`च्या अडचणीत वाढ;  वितरण प्रमुख घनश्याम सिंगला मुंबई पोलिसांनी घातल्या बेड्या
X

मुंबई पोलिस सध्या तपास करत असलेल्या टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट) घोटाळ्याप्रकरणी हि अटक करण्यात आली, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.रिपब्लिक मिडीयाचे सहाय्यक उपाध्यक्ष असलेले सिंग यांना सकाळी 7.40 च्या सुमारास निवासस्थानावरून पोलिसांनी ताब्यात घेतले.

या अटकेमुळे टिआरपी घोटाळा प्रकरणातील गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआययू) अटक झालेल्यांची संख्या १२ पर्यंत नेली आहे. पैसे देऊन टिआरपी वाढवल्याचा रिपब्लिकवर आरोप आहे. सिंग यांच्यावर यापूर्वी पोलिसांनी अनेकदा चौकशी करण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

बनावट टीआरपी घोटाळा गेल्या महिन्यात उघडकीस आला असताना रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) हंसा रिसर्च ग्रुपमार्फत तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये असा आरोप केला जात आहे की काही दूरचित्रवाणी वाहिन्या टीआरपीसाठी घोटाळा करत आहेत. रिपब्लिक वाहीनीचे संपादक अर्णब गोस्वामी सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.`रिपब्लिक`च्या अडचणीत वाढ; वितरण प्रमुख घनश्याम सिंगला मुंबई पोलिसांनी घातल्या बेड्या`रिपब्लिक`च्या अडचणीत वाढ; वितरण प्रमुख घनश्याम सिंगला मुंबई पोलिसांनी घातल्या बेड्या

Updated : 10 Nov 2020 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top