महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर कोणकोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत?

courtesy- Social media

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगर पालिकेने (BMC) जय्यत तयारी केली आहे. महापालिकेने शिवाजी पार्क मैदानात दहा हजार आंबेडकरी अनुयायांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

त्याशिवाय शिवाजी पार्क, चैत्यभूमी आणि आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच चैत्यभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग आदी ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्य सेवेची व्यवस्था या चैत्यभूमीवर करण्यात आल्याचे चित्र देखील पाहायला मिळालं आहे.
१ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा अनुयायींसाठी करण्यात आला आहे.

शिवाजी पार्क मैदान व परिसरात १८ फ‍िरती शौचालये तात्पुरती स्वरूपात असणार आहेत. दर्शन रांगेतील अनुयायांसाठी ४ फ‍िरती शौचालये देखील असणार आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या ३८० नळांची व्यवस्था तात्पुरत्या स्वरुपात बसवण्यात आले आहेत.
त्याशिवाय संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात १६ टँकर्स लावण्यात आले आहेत.

राज्यभरातून जे अनुयायी राज्यातून चैत्यभूमीवर येतात ते समुद्र किनारी पोहण्यासाठी जाऊ नये. त्यासाठी चैत्यभूमीलगतच चौपाटीवर सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. चैत्यशभूमी येथील आदरांजलीचे शिवाजी पार्कात मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण होण्यासाठी L.E.D देखील बसवण्यात आले आहेत.

शिवाजी पार्क मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटांवर अच्छादन देखील पसरवण्यात आली आहेत. शिवाजी पार्क परिसरात ४६९ स्टॉल्सची रचना देखील करण्यात आली आहे.

हे ही वाचा…

ऊस लागवड़ीची एक डोळा पद्धत शेतकऱ्यांच्या फ़ायद्याची की तोट्याची? 

पुराने उद्ध्वस्त झालेल्या शाळा कधी दुरुस्त होणार?

कांदा महागला, अर्थमंत्री म्हणतात मी जास्त कांदा खात नाही 

मोबाईल चार्जिंगकरि‍ता शिवाजी पार्क मैदानातील मंडपात ३०० पॉइंट काढण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अनेक सुविधा शिवाजी पार्कवर लाखो अनुयायीसाठी देण्यात आलेले आहेत. अशी माहिती मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर जे लाखो अनुयायी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत. त्यांनी मोबाईल, दागिने इत्यादी वस्तूंची त्यांनी स्वत: काळजी घ्यावी. असं आवाहन मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी जनतेला केले आहे.