Home > News Update > मुंबईतील आगीच सत्र कायम, नामांकित मॉल मध्ये लागली आग

मुंबईतील आगीच सत्र कायम, नामांकित मॉल मध्ये लागली आग

मुंबईतील आगीच सत्र कायम, नामांकित मॉल मध्ये लागली आग
X

मुंबईत गेल्या काही काळापासून आगीचं सत्र सुरू झालं आहे. गुरुवारी पहाटे मुंबईतील उच्चभृ वस्ती असणाऱ्या पवई भागातील एका सुपरमार्केटमध्ये आग लागली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईतील पवई हा भाग उच्चभ्रू वस्तीसाठी ओळखला जातो. याच भागात हिरानंदानी परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हायको सुपरमार्केटमध्ये गुरुवारी सकाळी ६.१५ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली.

या अगीच स्वरूप सत्र २ चं असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे महापालिकेकरून तातडीने अग्निशमन दलाच्या किमान नऊ गाड्या, पाण्याच्या जेटी आणि इतर उपकरणे घटनास्थळी पाठवण्यात आली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती देखील या अधिकाऱ्यांनी दिली.

Updated : 7 July 2022 5:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top