Home > News Update > मुंबईत वसतिगृहातच तरुणीचा ब-ला-त्का-र करून खू-न, आरोपीनेही केली आ-त्म-ह-त्या

मुंबईत वसतिगृहातच तरुणीचा ब-ला-त्का-र करून खू-न, आरोपीनेही केली आ-त्म-ह-त्या

गेल्या काही दिवसांपासून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच मुंबईतील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या चर्चगेट परिसरातील वसतिगृहात 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुंबईत वसतिगृहातच तरुणीचा ब-ला-त्का-र करून खू-न, आरोपीनेही केली आ-त्म-ह-त्या
X

चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्यानंतर बलात्कार आणि खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर वसतिगृहाचा सुरक्षारक्षक फरार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संशयाची सुई सुरक्षारक्षकाच्या दिशेने फिरली. मात्र त्यानंतर पोलीसांनी त्याचा शोध घेतला. यामध्ये सुरक्षारक्षकाचा मृतदेह चर्नी रोड रेल्वे रुळावर आढळला. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने तरुणीवर बलात्कार करून आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवली आहे.

पिडीत तरुणी ही अकोल्यातील रहिवासी असून वांद्रे येथील एका महाविद्यालयात शिकत होती. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मुलीचा मृतदेह तिच्या खोलीत आढळून आला. मरीन ड्राईव्ह पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळल्यानंतर बलात्कार आणि खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. वसतिगृहातील सुरक्षा रक्षक प्रकाश कनोजिया हा फरार होता. त्याचा मोबाईल वसतिगृहात आढळून आला. त्यानंतर पोलीसांनी त्याचा शोध घेतला.

दरम्यान, रात्री 11 वाजता चर्नी रोड रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. रुळावर सापडलेला मृतदेह हा वसतिगृहातून फरार झालेला गार्ड प्रकाश कनोजियाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक टाळण्यासाठी त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिस अधिकाऱ्यांचा संशय आहे. मात्र चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहातच तरुणीचा मृतदेह सापडल्याने राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Updated : 7 Jun 2023 3:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top