Home > News Update > म्युकरमायकोसीवरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स शासन खरेदी करणार

म्युकरमायकोसीवरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स शासन खरेदी करणार

म्युकरमायकोसीवरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स शासन खरेदी करणार
X

म्युकरमायकोसीस आजाराचं दुसऱ्या टप्प्यात प्रमाण वाढलं आहे. तसंच या आजाराची औषधं खूप महाग असल्याने राज्यसरकारने आता ही महागडं इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आता या आजारावरील १ लाख म्युकर मायकोसीस च्या व्हायल्स खरेदी करणार आहे.

माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होते.

मधुमेह नियंत्रीत नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे प्रमाण वाढत असून या आजारावरील प्रभावी ठरलेले इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हाफकीनकडे मागणी नोंदविण्यात आली असून ती दिवसांची निविदा काढून त्याची खरेदी प्रक्रीया केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील. असं राज्यसरकारने जाहीर केलं आहे.

ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही. त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येतो. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरी परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेच असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन दखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असू त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाणार आहे.

या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रीत ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Updated : 11 May 2021 1:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top