Home > News Update > MPSC स्पर्धा परीक्षा तिढा जुना आणि नवीन अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे हित कशात ?

MPSC स्पर्धा परीक्षा तिढा जुना आणि नवीन अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे हित कशात ?

MPSC स्पर्धा परीक्षा तिढा जुना आणि नवीन अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे हित कशात ?
X

MPSC नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तिसऱ्यांदा विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामध्ये आतापर्यंत सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विद्यार्थ्यांमध्ये जात त्यांची भेट घेऊन या संदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं.

या आधी सुद्धा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe), भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), अभिमन्यू पवार (Abhimanyu pawar), माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) इत्यादी राजकीय नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जुना आणि नवीन अभ्यासक्रमातील फरक काय ?

जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा objective पद्धतीने होत होत्या. आता जाहीर झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार descriptive पद्धतीने परीक्षा होणार आहेत. नवीन अभ्यासक्रमाला आमचा विरोध नाही मात्र त्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांचे हित कशात याचा वेध घेण्यासाठी Twitter space च्या माध्यमातून Max Maharashtra ने चर्चासत्राचे आयोजन केले होते.

यादरम्यान नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा ही विद्यार्थ्यांची मागणी होती. शिवाय हा अभ्यासक्रम विद्यार्थी हिताचा असल्याने तो तात्काळ लागू झाला पाहिजे ही मागणी सुद्धा पुढे आली.

Max Maharashtra चे संपादक रवींद्र आंबेकर (Ravindra Ambekar) म्हणाले, "पूर्वी विद्यार्थ्यांचे आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या मागण्या व विद्यार्थी संघटनांशी निगडित होते. मात्र आता ते राजकीय पक्षांचे होताना दिसत आहेत.आतापर्यंत या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता तात्काळ निर्णयाची गरज आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको."

Max Maharashtra चे वरिष्ठ पत्रकार विजय गायकवाड म्हणाले, " विद्यार्थ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता यावर स्वतः विचार करून आपल्या हिताचं काय आहे हे लक्षात घ्यायला हवं. ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र केवळ स्पर्धा परीक्षा हे ध्येय न ठेवता त्यात जर अपयश आलं तर इतर नियोजन विद्यार्थ्यांनी आधीच करून ठेवायला हवं. पत्रकार म्हणून सध्याची परिस्थिती चिंताजनक वाटते. प्रत्यक्षात भाषणांच्या माध्यमातून अनेक प्रभावी गोष्टी मांडणारे अधिकारी, राजकारणी पाहायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात अनेकांची कामगिरी संशयास्पद आहे. याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.

आम्ही यासंदर्भात माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. "जुना अभ्यासक्रम यायलाच नको होता. नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. सर्वपक्षीय राजकीय नेते विद्यार्थ्यांचा वापर करत आहेत. विद्यार्थ्यांनी याचा विचार करून नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यास करायला हवा, असे मत महेश झगडे यांनी व्यक्त केले आहे.

या स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी भावी अधिकारी आहेत. त्यांना अशा पद्धतीने कायम रस्त्यावर आक्रमक होण्याची वेळ येणे योग्य नाही. त्यामुळे राज्य सरकार व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी तात्काळ विद्यार्थ्यांचा निर्णय घ्यावा ही अपेक्षा या ट्विटर स्पेसच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली.

Updated : 23 Feb 2023 11:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top