Home > News Update > खासदार उदयनराजे भोसले यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका

खासदार उदयनराजे भोसले यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका

खासदार उदयनराजे भोसले यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका
X

साताराचे क्रीडा संकुल बांधण्यासाठी ज्या बांधकाम व्यवसायिकाची निवड करण्यात आली अश्या माहिती नसलेल्या बांधकाम व्यावसायिकाला क्रीडा संकुल बांधण्याचे काम साताऱ्याचे तत्कालीन पालकमंत्र्यांकडून देण्यात आले होते.अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली

सातारा क्रीडा संकुलाची अवस्था बिकट झाली असल्याचे सांगत या ठिकाणी कोणत्याही खेळाडूला आपले प्राविण्य दाखवता येत नाही. हे क्रीडा संकुल नसून ते व्यापारी संकुल म्हणून उभारण्याची संकल्पना साताऱ्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम व्यावसायिक राजेंद्र चोरगे यांचे नाव न घेता त्यांच्यावर साताऱ्यात आयोजित युवक परिसंवाद मेळाव्यात टीका केली आहे.

ज्यावेळी स्टेडियम नव्हतं त्यावेळी आपण त्याठिकाणी रणजी मॅच तेथे घेऊ शकत होतो आता मात्र तशा मॅच घेता येत नाहीत याची खंत वाटते असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

Updated : 17 Oct 2021 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top