Home > News Update > पंतप्रधानांची १२ कोटींची गाडी, संजय राऊत यांचा रोखठोक सल्ला

पंतप्रधानांची १२ कोटींची गाडी, संजय राऊत यांचा रोखठोक सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या बुलेटप्रूफ गाडीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधानांची १२ कोटींची गाडी, संजय राऊत यांचा रोखठोक सल्ला
X

नवी दिल्ली // पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या बुलेटप्रूफ गाडीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात एका नव्या गाडीचा समावेश करण्यात आलाय. ही बुलेटप्रूफ गाडी असून संपूर्णपणे जर्मन बनावटीची ही कार आहे. यावरून शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी 'सामना'च्या रोखठोक या सदरातून भाष्य केलं आहे.

"मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान हे जगासमोर गंगास्नान करतात, म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. २०२१ अनेक जळमटं तशीच ठेवून सरलं आहे ", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी घेतलेल्या कारवरूनही राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. "२८ डिसेंबर रोजी पंतप्रधानाांसाठी विकत घेतलेल्या १२ कोटींच्या नव्या मर्सिडीज कारची छायाचित्र माध्यमांनी छापली. स्वत: फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांच्या सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये", असा निशाणा राऊत यांनी लगावला

यावेळी राऊतांनी नेहरू, म. गांधी, इंदिरा गांधी यांची उदाहरणं दिली. "पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वात जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. पंतप्रधान मोदींची १२ कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे", असं राऊतांनी यात नमूद केलं आहे.

Updated : 2 Jan 2022 4:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top