Home > News Update > खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला ठेकेदाराला काळे फासण्याचा इशारा

खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला ठेकेदाराला काळे फासण्याचा इशारा

खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला ठेकेदाराला काळे फासण्याचा इशारा
X

शिर्डी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहाता तालुक्यातील आरोग्य सुविधांसह सर्व उपाययोजनांचा आढावा घेतला.

ग्रामीण रुग्णालय राहाता व शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांनचे साईनाथ व साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील कोविड सेंटर व आरोग्य केंद्राची पाहणी केली. नव्याने रुजू झालेल्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांचे स्वागत करून विविध प्रश्ना संदर्भात चर्चा केली. पुढच्या 10 - 15 दिवसांमध्ये रुग्णांची जास्त संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार विखे यांनी आज संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला.साईबाबा संस्थानने प्रत्येक वेळेस कोरोनाच्या भीषण परिस्थितीत फार मोठं सहकार्य केलं असून यापुढेही असंच सहकार्य लागणार असल्याचं विखे यांनी स्पष्ट केलं.

कोपरगाव ते नगर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषीत झाला, या रस्त्याचं काम येत्या पंधरा दिवसात सुरु न केल्यास ठेकादाराला पकडुन त्याच्या तोंडाला काळ फासण्याचा इशारा भाजपाचे खासदार सुजय विखेंनी दिला आहे. नगर ते मनमाड या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेत चांगला रस्ता शोधुनही सापडणार नाही याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतोय, मात्र मागील कालावधीत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नगर- मनमाड महामार्गावर चिखल बघायला मिळतो.

रस्ता दुस्तीची मागणी नागरीक करत असून तर काही ठिकणी खड्यात बसुन आंदोलने केली जात आहेत. मात्र आता केंद्राकडून साडेचार कोटी मंजुर करुन आणलेत तरीही पंधरा दिवसात काम सुरु न झाल्यास खासदारांनी ठेकेदाराला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

Updated : 14 Sep 2021 1:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top