Home > Max Political > खासदार डॉ. श्रीकांत शिंदेना यंदाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेना यंदाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर

MP Dr. Shrikant Shinde announced this year's Parliament Ratna Award

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेना यंदाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर
X

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह पाच लोकसभा सदस्यांची यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भाजपचे खासदार सुधीर गुप्ता, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा आणि भाजपच्या सुकांता मजुमदार हे १७ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत आयोजित समारंभात हे पुरस्कार देण्यात येणार आहे.


खासदार डॉ. श्रीकांत शिंदें संसदरत्न

डॉ. श्रीकांत शिंदे हे २०१४ च्या कल्याण मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत अत्यंत तरुण खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीतही जास्त मताधिक्याने डॉ. श्रीकांत दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार आहेत. लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा उभारण्यापासून सर्वच टप्प्यांवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. लोकसभेतील कामकाजात डॉ. श्रीकांत शिंदे सहभागी होत असतात. आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर डॉ. शिंदे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे हे १७ व्या लोकसभेतील खासदार असून त्यांच्या कामगिरीवर संसदेने मोहोर उमटवली आहे.२०१९ ते ते २०२३ या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत ५५६ प्रश्न उपस्थित केले आहेत. ६७ चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि १२ खाजगी विधेयक त्यांनी मांडली आहेत.


संसदरत्न पुरस्कार कधी सुरु झाला ?

१९९९ साली स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेला ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेवरून २०१० पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी संसदरत्न पुरस्कार प्रदान केला जातो. तर संसद महारत्न पुरस्कार दर पाच वर्षातून एकदा दिला जातो.केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात.प्राइम पॉइंट फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष के श्रीनिवासन म्हणाले की, हे पुरस्कार खासदारांच्या सर्वसमावेशक कामगिरीवर आधारित आहेत, अर्जुन राम मेघवाल, कायदा आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिष्ठित ज्युरी समितीद्वारे नामांकित व्यक्तींची निवड केली जाते. भारतातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांना सन्मानित करण्यासाठी नागरी समाजाकडून दिला जाणारा हा एकमेव पुरस्कार आहे.

Updated : 8 Jan 2024 1:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top